महंत कवी राज शास्त्री
साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 70
☆ सर्वात मोठं विद्यापीठ… ☆
नखे काढता सहज
बालपण लीलया आठवलं
शिकवण मिळाली कधी
तिला मी पुन्हा अभ्यासलं…०१
आई सांगायची बाळा
नखे विषारी असतात
तांदूळ समजून चिमण्या
चिमण्या त्यास खातात…०२
चिमण्यांनी त्यास खाता
चिमण्या हकनाक मरतात
अबोल बिचाऱ्या चिमण्या
मुकाट्याने मरण स्वीकारतात…०३
सर्वात मोठं विद्यापीठ
आपली स्वतःची आई असते
शिकवण आईची निर्व्याज
त्याला कुठेच तोड नसते…०४
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈