श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ मराठी माय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
इंग्रज आले राहून गेले
कौतुक त्यांचे ठेवून गेले
त्याचे सण साजरे करतो
डोक्यावर घेऊन नाचत बसतो
होळी झाली गावठी गड्या
डिसेंबर एंडला मारू उड्या
पाडवा गेला अंधारात
जानेवारीचा धरला हात
मराठी माऊली विसरून गेलो
इंग्रजी मावशीचे लाडके झालो
फॅशन फॅशन खेळत बसतो
आपल्या संस्कृतीला आपण हसतो
इंग्रजी म्हणतो किती महान
तिच्याकडे ठेवतो डोके गहाण
असे करुन साधले काय
मराठी मायेची आहेना माय
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈