सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कुसुमाग्रज … ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

| कुसुमाग्रजा ज्ञानपीठ मानकरी तू

  वैविध्याचा असे चित्रकार तू

  तव प्रतिभेची गरुड भरारी

  साहित्य शारदेचा असे पुजारी |

 

| काव्याची फुलवुनी फुलबाग

  विशाखा, जीवनलहरी, वादळवेल

  अन्यायाचा दूर करूनी रोग

  फुलविशी समता बंधुत्वाची वेल |

 

| सामाजिक प्रेमाची ज्योत घेऊन

  जपे माणुसकीचा मंत्र महान

  दुर्दम्य आशेला देउनी अग्रस्थान

 कोलंबसचा गायीला अभिमान  |

| नटसम्राटाचा जणू तू विधाता

  शोकांतिकेचा जणू तू निर्माता

  यशो शिखरावर ही कलाकृती

  रसिक मने जिंकल्याची घेई पावती |

| तव कल्पकतेची किमया भारी

 पृथ्वीच्या प्रेम गीताची उंची न्यारी

 सूर्य पृथ्वीची जोडी गोजिरी

 अमर प्रणय गीताची मूर्ती साजिरी |

 | नाटक, काव्याला यशो मंदिरात बसविले

   कथा कादंबरीला  अंगाखांद्यावर खेळविले

   विविध पुरस्कारांनी तुजला भूषविले

   मातृभाषेचे निशाण उंचविले |

| वर्षा मागून वर्षे सरली

  परी तव कीर्ती ज्योत अमर जाहली

  अजरामर आहे तव साहित्य कलाकृती

  जोवरी आहे शशांक आदित्यची महती |

 

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments