श्री शरद दिवेकर

संक्षिप्त परिचय..

नाव – शरद दिवेकर

वय – ६० वर्षे

महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागातून सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाच्याच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीत कार्यरत आहे.

संगीत श्रवण, साहित्य वाचन व साहित्य लेखनाची आवड आहे. कथा, कविता, ललित, हायकू, स्फुट असे साहित्य प्रकार हाताळलेले असून भाषांतर करायची देखील आवड आहे.

? कवितेचा उत्सव ?

☆ हायकू… ☆ श्री शरद दिवेकर ☆

मध्यंतरी साहित्यातील ‘हायकू’ हा प्रकार समजला. त्याची रचना पुढीलप्रमाणे असते. तीन ओळीत आशय मांडणी;

अक्षरांची संख्या – पाच, सात आणि पाच व यमक जुळायला हवं.

 

[ ०१ ]

सुख तुडुंब

ते चौकोनी कुटुंब

खुशनशीब

 

[ ०२ ]

तू अन्नपूर्णा

ती चव काय वर्णा

तू परिपूर्णा

 

[ ०३ ]

हुंदका आला

जीव गलबलला

पाठवणीला

 

[ ०४ ]

साहित्य, कला

जो तो लिहिता झाला

वाचता झाला

 

[ ०५ ]

आता सरावा

हा वैशाख वणवा

वरूण यावा

 

[ ०६ ]

सोनसळी ती

तिची कोमल कांती

मोहवते ती

 

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments