कवितेचा उत्सव
☆ या बाई या ☆ कवी दत्त (विठ्ठल दत्तात्रेय घाटे)☆
[विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ – ३ मे, १९७८) ]
या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया
ऐकू न येते,
हळुहळू अशी माझी छबी बोलते
डोळे फिरविते,
टुलूटुलू कशी माझी सोनी बघते
बघा बघा ते,
गुलूगुलू गालातच कशी हसते
मला वाटते,
हिला बाई सारे काही सारे कळते
सदा खेळते,
कधी हट्ट धरून न मागे भलते
शहाणी कशी,
साडीचोळी नवी ठेवी जशीच्या तशी.
– कवी दत्त (वि.द.घाटे)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈