कवितेचा उत्सव
☆ स्वर वेगळेच होते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
बदलून आरसे कितीदा मी पाहिले स्वत:ला.
स्वरुप ते तरीही प्रतिबिंब वेगळे होते.
ऋतू बदलले क्रमाने तो वृक्ष तोच होता.
पक्षांच्या थव्यांचा मुक्काम वेगळा होता.
डोईवरी प्राक्तनाचे आकाश एक जरीही.
अतर्क्य गूढ आकलनाचे रंग वेगळे होते.
कित्येक जन्ममृत्यू आयुष्यचक्र ठरले.
अंदाज जगण्याचे निराळे वेगवेगळेच उरले.
हे मानले जरीही अंतिम तत्व एक.
प्रत्येक प्रार्थनांचे स्वर वेगळेच होते
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈