कवितेचा उत्सव
☆ सुखी संसाराचं रहस्य ☆ श्री सोमनाथ साखरे ☆
सहज सुचलं म्हणून… सुखी संसाराचं रहस्य
बायको बोलत असताना
आपण शांत रहावं,
वादळ शांत झाल्यावर
निःशब्द गाणं गावं
नैराश्यात वादळ मग
स्वायंपाक घरात जातं
भांड्यांच्या गळ्यातून
कर्कश गाणं येतं
आपण आपलं तेव्हा
कर्णबधिर व्हायचं
वर्तमानपत्रा आडून
गुपचूप फक्त बघायचं
अनुभवाने सर्वकाही
अंगवळणी पडेल
संसार होईल सुखाचा
सारं शुभ घडेल.
© श्री सोमनाथ साखरे
नाशिक
मोबा.९८९०७९०९३३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈