श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ पळसफुल… ☆ श्रीशैल चौगुले ☆
पालवीविना फुलतो
कसा पळसफुल
ऋतुतला हा बहर
ऊन्हातली ही भुल.
कोकीळ कंठ मधूर
ऊसंती जीवा धीर
स्वरात प्रेम व्यथा
हृदयी स्मृती संकुल.
जरा वार्याचा स्पर्श
डोळे दिपवी नभ
झळा अस्वस्थ देहा
वाटा जुन्या विपुल.
लागे डुलकी क्षणा
मनात भेटी गाठी
जीवन सरले जे
जणू पळसफुल.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈