सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ स्पर्श… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆
तुझा स्पर्श बोले, तू मला मोहरावे
तुझ्या धुंद प्रेमाने उमलुन यावे
नकळत तुझ्या स्पर्शाची किमया घडावी
तुझी मी, अन माझा तू ही कवाडे खुलावी
अलगद मी तुझ्या श्वासात मिसळावे
तू असाच माझ्या अंतरी स्थिरावे
रोमारोमातून मग तुझीया मी पाझरावे
अन् मला सावराया तू तल्लीन व्हावे .
© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Wow great pallavi
सुंदर भावपूर्ण प्रेममय अभिव्यक्ति