कवितेचा उत्सव
☆ निरपेक्ष… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
साफल्य वैफल्य ,
दोन्हीही सापेक्ष .
निरपेक्ष मन,
असो द्यावे.
असो द्यावे मन,
सावचित्त थोडे.
अबलख घोडे,
एरवीचे .
एरवीचे जिणे ,
जुनेच पुराणे.
ओठावर गाणे,
यावे पुन्हा .
यावे पुन्हा सारे,
परतून वारे.
शैशवाचे तारे,
आकाशी या.
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈