श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 99 – प्रारब्ध माणसाचे ☆
प्रारब्ध माणसाचे कोणास ना कळे।
हे भोग संचितांचे चुकवून का टळे।
हा देह राबवूनी जगतास पोसणारा ।
राहूनिया उपाशी गळफास आवळे।
खोटीच स्वप्न सारी दुनियेस दाविशी ।
जगतास ठकविणारे हे भास आगळे।
देऊन तेज बुद्धी छळवाद का असा।
पैशाविना न शाळा तिळमात्र ही पळे।
संतान सौख्य शोधा प्रासाद गुतं ले।
तान्हास काय देऊ रंकास ना कळे।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈