श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
गुलाबी सण…
श्री प्रमोद वामन वर्तक
रंग सगळे अंगावरले
झाले असतील ते धुवूनी,
रंग करांचा नसेल गेला
कालची धुळवड खेळूनी !
ठेवा शिल्लक त्यावर थोडा
सुंदर गुलाबी रंग प्रेमाचा,
मनांत पक्के ठरवा तुम्ही
त्यास जन्मभरी जपायचा !
करावी सदा सर्वदा तुम्ही
प्रेम रंगाची ती उधळण,
मग होईल आयुष्य तुमचे
न संपणारा गुलाबी सण !
© श्री प्रमोद वामन वर्तक
ठाणे.
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈