श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ रामायण… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
पाहिलेस मज हसून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण
लाजलीस तू वळून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण
नेमकाच तो गुलाब साधा होता हाती माझ्या तेव्हा
घेतलास तू दडून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण
आस लागली खरीच वेडी दोघानाही भेटायाची
थांबलीस तू नटून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण
वेळ लाभली तशीच होती दोघानाही एकांताची
बोललीस तू जपून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण
फार देखणे स्वरूप होते मौना मधल्या चंद्राचेत्या
शोधलेस तू हटून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण
आज काल ही नवीन चर्ची जेथे तेथे चालू आहे
भेटतेस तू लपून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण
नाव जोडले अजून आहे घेणारानी घेत बसावे
ओठघेतले मिटून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈