महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 79
☆ अभंग… महाराष्ट्र माझा ☆
महाराष्ट्र माझा, संतांचीच भूमी
माझी कर्मभूमी, हीच झाली…!!
देव अवतार, इथेच जाहले
संतांनी पूजिले, ईश्वर ते…!!
सात्विक आचार, सुंदर विचार
महाराष्ट्र घर, माझे झाले…!!
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम
जीवन निष्काम, संतांचे हे…!!
शौर्याची पताका, इथे फडकली
तोफ कडाडली, गडावर…!!
शिवबा जन्मला, शिवबा घडला
माता जिजाऊला, आनंद तो…!!
मराठी स्वराज्य, शिवबा स्थापिले
मोगल पडले, धारातीर्थी…!!
ऐसा माझा राजा, छत्रपती झाला
निर्भेळ तो केला, कारभार…०९
दगडांच्या देशा, प्रणाम करतो
अखंड स्मरतो, बलिदान…!!
कुणी आक्रमण, तुझ्यावर केले
सदा हल्ले झाले, भूमीवर…!!
चिरायू हा होवो, कण कण तुझा
नमस्कार माझा, स्वीकारावा…!!
कवी राज म्हणे, निसर्ग सौंदर्य
आणि हे औदार्य, कैसे वर्णू…!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈