सौ.मंजुषा आफळे
कवितेचा उत्सव
☆ अभंग… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
नित्य ते भजन | हरीचे स्मरण||
श्रद्धा जागरण | संतवाणी ||
देई समाधान | अंतरात ज्योत||
समईची वात | तेवताना||
आनंदे वंदन | ठेविले मस्तक||
आवडे स्वस्तीक | दारातले ||
मन चिंब ओले | स्वर बरसती ||
गाऊया आरती | भक्तिभावे ||
गंध दरवळ | शांत गाभार्यात ||
भेट एकांतात | विश्वनाथा ||
पाठीशी उभा जो | विठ्ठल सावळा ||
जीव होई गोळा | पाहताना ||
एकादशी दिनी | शब्दांची गुंफण ||
आले मी शरण भगवंता ||
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈