सुश्री त्रिशला शहा
कवितेचा उत्सव
☆ चला जाऊया पिकनिकला… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
सुट्टीच्या दिवसात पिकनिकला कुठे जायचं ते ठरवा.
(चाल- चल उड जा रे पंछी)
चला जाऊ पिकनिकला,पाहुया भारत देश हा न्यारा……..
कोकणचे ते रुप मनोहर, सागराच्या लाटा
आंबा,फणस,काजूंचा मेवा,शहाळ्याचा गोडवा
निसर्गाचा मस्त नजारा,पाहून घेऊ चला ना
चला जाऊ….
मस्त फुलांच्या सुंदर बागा, अनुपम्य काश्मीरला
सफरचंद,अक्रोडचा साठा,दाल सरोवरी फेरा
बर्फाच्या राशीत खेळता,आनंद अनुभवू खरा
चला जाऊ……
राजस्थानची बातचं न्यारी,महल,पँलेसची दाटी
वाळूमधुनी फिरण्यासाठी,उंटाची सफारी
माऊंट अबू अन् शहर गुलाबी, डोळे भरुनी पाहाण्या
चला जाऊ……
सुंदर बीच अन् माडांची शोभा,समुद्राची गाज
चर्च,मंदिर सुरेख तिथे,निसर्गाची लयलूट
गोव्याची ही सुपीक भूमी,पाहून येऊ चला ना
चला जाऊ…….
हिमालयात बर्फांच्या राशी,दरी-खोऱ्यांची चढाई
मानसरोवरी भक्तीचा महिमा,’हर’ दर्शन कैलासी
बद्री,केदार मंदिर सुंदर,गंगेचा उगम पहाण्या
चला जाऊ……
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈