महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 81
☆ अभंग… ☆
अजर अमर, ग्रंथाचे आगार
साधा व्यवहार, ज्ञानालागी…!!
ग्रंथ असतात, ज्ञानाचे भांडार
करावा आदर, सदोदित…!!
मनुष्य सजीव, परि तो अज्ञान
ग्रंथ देती ज्ञान, मुक्तहस्ते…!!
सागरात जैसी, रत्ने मिळतात
तैसे या ग्रंथात, ज्ञान रत्न…!!
ग्रंथाचे वाचन, सतत करावे
प्रश्न विचारावे, ग्रंथाला हो…!!
ग्रंथ गुरु जाना, शमती वेदना
देतील प्रेरणा, जगण्याला…!!
कवी राज म्हणे, ज्ञान मिळवावे
ग्रंथास वाचावे, अखंडित…!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈