श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ प्रणवरहस्य !… ☆ श्रीशैल चौगुले ☆
पायाखालची जमीन सरता
आभाळाची आस ऊरते
दिशांचे वार्यातले घरटे
जळी श्वास कुस तरते.
क्षितीजाची काया खण-खंबीर
ब्रम्हांडाचे ध्यास धरते
वज्रातून तप्त लहरी
प्रणव तेज प्रखरते.
समुद्राची माया वाहे अनंत
शीतल शशीत भरते
अन् शलाका होता डोळे
तिमीराचे भय सरते.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈