कवितेचा उत्सव
☆ मिठी ☆ मेहबूब जमादार ☆
आणेन चंद्र म्हणते
तुझे येणे लांबलेले
आणेन दिप म्हणते
धुके धरा लपेटलेले
विरहाचे क्षण कसे
काळजाला छेदलेले
आठवांचे पेव सा-या
भोवताली विखुरलेले
प्रेमात ऊर फुटता
नेत्र अश्रूंनी भारलेले
मोहक क्षण भेटींचे
तुझ्या पथी पसरलेले
तू नसताना कसे
क्षण मनी गोठलेले
पाहू दे सख्या मला
तुझ्या मिठीत गुंफलेले……
*️⃣ मेहबूब जमादार
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈