श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
माझा गांव !
श्री प्रमोद वामन वर्तक
माझ्या गावच्या वेशीवर
सुंदर स्वागत कमान,
होते स्वागत पाहुण्यांचे
देऊन त्यांना योग्य मान !
माझ्या गावच्या वेशीवर
मंदिरी वसे ग्रामदेव
सांज सकाळ पूजा करी
आमच्या गावचा गुरव !
माझ्या गावच्या वेशीवर
दगडी कौलरू शाळा,
धोतर टोपीतले गुरुजी
लावती अभ्यासाचा लळा !
माझ्या गावच्या वेशीवर
मंदिरा जवळच तळे,
त्यात दंगा मस्ती करती
पोहतांना मुले बाळे !
माझ्या गावच्या वेशीवर
म्हादू पठ्य्याची तालीम,
गावचे होतकरू मल्ल
तालमीत गाळीती घाम !
माझ्या गावच्या वेशीवर
वडा भोवती मोठा पार,
गप्पा टप्पा करण्या सारे
सांजेला जमती त्यावर !
© श्री प्रमोद वामन वर्तक
१८-०५-२०२२
ठाणे.
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈