श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 105 – ही आस जीवनाची ☆
ही आस जीवनाची सोडू नको अशी।
उर्मी नवी मनाची हरवू नको अशी।
येतील वादळे ही झेलीत जा तया।
हा तोल सावराया कचरू नको अशी।
दारूण हार येथे चुकली कधी कुणा?
हो सज्ज जिकं ण्याला परतू नको अशी।
हेफास पेरलेले गळ लावले जरी।
प्रत्येक पावलांवर दचकू नको अशी।
स्पर्धेत खेचणारे आप्तेष्ट ते जनी
घे वेध भावनांचा अडकू नको अशी।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈