सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ सांग सये… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सांग सये तुज कुठे मांडावे

कवितेच्या चौकटीतुनी का

भरून आल्या आभाळातूनी

तुझ्याच ठायी दिसते मजला

क्षितीजामधली गूढ निळाई ….. १

 

तुझ्या मौनाची निरगाठ ही

वाटे व्हावी सैल थोड़ी

सांधलेस तू सगे सोयरे

वळ गाठीचे तुझ्याच पायी ….. २

 

तिलांजली दिलीस सर्वांसाठी

तुझ्यातल्या स्त्रावांना होमातूनी

तुझ्यातल्या तुला कसे ग

दिलेस कायम दूर लोटुनी …. ३

 

बघ जरा तू सत्वर आता

काय मागते तुझी ही काया

झुगारून दे पायातील बेड्या

बोलावती तुला वाटा या वेड्या …….. ४

 

खुलु देत नवे पंख मनीचे

स्वार होऊनी जा तुझ्याच देशा

होईल मनोहर स्वप्न अंतरीचे

पूर्णत्वाची प्रचीती द्याया ….. ५

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments