श्री अमोल अनंत केळकर
☆ कवितेचा उत्सव ☆ न्यूज पाहून सुचले सारे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
(हरघडी ‘ब्रेकींग न्यूज’ पाहून तत्काल ‘टुकार’ विडंबनाच्या जिलबया पाडणार्या सर्व ‘सुमार’ कवींना समर्पित. मूल गाणे – शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले)
न्यूज पाहून सुचले सारे, ‘टुकार’च्या पलिकडले
प्रथम कडवे रचले आणिक लिहू नये ते लिहिले.
अर्थ नवा काव्यास मिळाला’
बूट जुना पण गाल सुजला
त्या दिवशी का प्रथमच माझे ‘विडंबन’ अडखळले.
जुळवितो यमकांना रात्री
लक्ष विचार सुचतील खात्री
‘विसंगती’त या विश्वाच्या, रहस्य मज उलगडले।
न्यूज पाहून सुचले सारे, ‘टुकार’च्या पलिकडले
प्रथम कडवे रचले आणिक लिहू नये ते लिहिले.
© श्री अमोल अनंत केळकर
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
मैफिल ग्रुप सदस्य
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈