सुश्री त्रिशला शहा
कवितेचा उत्सव
☆ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त – निसर्ग रक्षण ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
पहिली माझी ओवी गं
निसर्गाचे रक्षण
झाडे, वेली जपुया
खत,पाणी देऊन…
दुसरी माझी ओवी गं
वसुंधरेला जपूया
मातीमधल्या अंकुराला
मायेचे शिंपण
तिसरी माझी ओवी गं
पाणीसाठा जपूया
नदी,विहीरीमधुनी
कचरा तो काढुया
चौथी माझी ओवी गं
पर्यावरणाचे राखण
प्लॅस्टिक चा वापर टाळून
प्राणीमात्रा जगवूया
पाचवी माझी ओवी गं
शेत मळे पिकवूया
पाऊस पाणी पडण्यासाठी
एक तरी झाड लावूया
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈