श्री आनंदराव रघुनाथ जाधव
परिचय
आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव – सारस्वत बँक निवृत्त कर्मचारी
कार्यकारी मंडळ सदस्य – महात्मा गांधी ग्रंथालय वखारभाग सांगली
सदस्य – जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल
कार्यवाह – छत्रपती श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ सांगली…
सम्प्रत्ति – कविता लिहण्याची आवड, साहित्य संमेलन सहभाग, सामाजिक कार्याची आवड, महात्मा गांधी ग्रंथालय येथ, काव्य संमेलन आयोजित करण्याचे नियोजन, गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, वृक्षारोपण, रक्तदान, इत्यादी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग
कवितेचा उत्सव
☆ || माऊली || ☆ श्री आनंदराव जाधव ☆
सुर्य अंगणी तुळस
शुभ सकाळी नमन
कर जोडोनी वंदन
प्रेम सुगंधी सुमन
दारी रंगली रांगोळी
दिप देव्हारी तेजला
घर सुमंगल झाले
मनी आनंद सजला
माय माऊली गंगाई
हाती कंकण वाजते
गाते मधूर भूपाळी
पायी पैंजण शोभते
धूप कापूर आरती
टाळ टाळी ही घुमते
नाम देवाचे मंजुळ
सुख गोकुळीं नांदते
© आनंदराव रघुनाथ जाधव
पत्ता – खणभाग, भारत चौक, शिवगर्जना मार्ग, “श्री ज्योतिर्लिंग”, २०७, सांगली.. संपर्क…८८३०२००३८९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈