महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 85
☆ अर्थ असेल काही जर तर… ☆
कसे सांगू सांगा तुम्ही, गोड महिमा भक्तीचा
भक्ती-विना होत नाही, मार्ग मोकळा मुक्तीचा…!!
मार्ग मोकळा मुक्तीचा, करा धावा श्रीप्रभुचा
तोच आहे वाली आता, अन्य कोणी न कामाचा…!!
अन्य कोणी न कामाचा, सर्व लोभी इथे नांदती
अर्थ असेल काही जर तर, मैत्री मग आग्रहे साधती…!!
मैत्री मग, आग्रहे साधती, धर्म हा लोप पावला
अंध-वृत्ती वर आली, सुज्ञ इथेच वेडावला…!!
सुज्ञ इथेच वेडावला, पाश-मोह आवळला
जाण इतुकीही न आता, ज्ञान-दीप मावळला…!!
ज्ञान-दीप मावळला, राज सहज बोलला
कृष्ण-भक्ती सोज्वळ, स्मरा श्रीगोविंदाला…!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈