सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ वारी….☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

ही पाऊले चालली , झपझपा पंढरीला

माय माऊली विठूला उराउरी भेटायला —

 

कुठे बरसे ही आग , तप्त सारे चराचर

कुठे फाटले आभाळ , सांडे सरीवर सर —-

मैलामागून हे मैल , मागे पडती या वाटा

कुठे येई आडवा नि , दांडगा हा घाटमाथा —-

 

तमा नाहीच कशाची , एक आस पंढरीची

मग पहाता पहाता , फुले होती ही काट्यांची —-

चंद्रभागा अवखळ , वाट पहाते काठाशी

तिची प्रेमळ ती भेट , वाहून जाती पापराशी —-

 

आता डोळ्यांमध्ये सारे प्राण जाहले हे गोळा

विश्व सारे पडे मागे , उरे विठूचाच लळा —

रूप साजिरे गोजिरे मन भरून पहाता

वाटे नको दुजे काही , पायांवाचून या आता —–

 

परब्रह्म हे भेटता , मोहोरले अंग अंग

चोहीकडे भरुनी राहे – पांडुरंग पांडुरंग—-

पांडुरंग — पांडुरंग—–

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments