डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ निष्ठा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
किती लाजिरवाणे । किती ओरबाडणे
किती टाळूवरचे । लोणी खाणे !
निष्ठा होतीच खरी । संपली का अशी ?
विश्वास मानवाप्रति ! सत्ता माज भारी
निष्ठेला पाय फुटले । काल होती घरी
लाचार पळून गेली । सत्तेच्या दारी
सत्य कुठे लपते । नजरेस का नाही ?
माज कसा रुजला । मृत्यू सत्य तरी ?
खेळ जगण्याचा । दिवसांचा काही
खेळ आकड्याचा । सरकार खेळ खेळी
रडीच्या डावाने । जनता त्रस्त बळी
काळीमा मानवतेला । ना भूषणावह काही
शालीनता,सभ्यता,नम्रता । सर्वश्रेष्ठ सद् वर्तनी
काय डोंगर, काय झाडी । निसर्ग, स्तब्ध दरी
नव्याने अंकुरेल का ! लोकांनी, लोकांकडून,
लोकांसाठी चालवलेली । लोकशाही देशांतरी !
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈