सौ. विद्या पराडकर
कवितेचा उत्सव
☆ हे पांडुरंगा ☆ सौ. विद्या पराडकर ☆
मन माझे पांडुरंग
गात होते अंग अंग
भक्ती भाव मनी नाचला
हर्ष भाव मनी खेळला
पंढरीची चन्द्र भागा वाहते अथांग
ज्ञानबा, तुकाराम गजर जाहला
टाळी वाजविता बुक्का उडाला
वारकरी नाचण्यात झाले दंग
कासे पीतांबर कटीवरी हात
गळ्यामध्ये शोभे वैजयंती माळ
भक्तांसाठी तू सगुण रुपात दंग
तव चरणी आस देवा
सतत करु दे तव धावा
माऊली मी तुझे बाळ राहो अभंग
© सौ. विद्या पराडकर
पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈