श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ काही हायकू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
अंगणातल्या झाडावर
कावळा ओरडतोय भुकेने…
घर नाचतय पाहुणे येणार या खुशीने…
*
रुक्ष झाडाच्या फांदीवर
किलबिलत पाखरू येऊन बसलं…
रात्री झाडं स्वप्नांनी डवरलं…
*
पहाटे थंडीत
रस्ते.. झाडं कुडकुडू लागली…
तशी धुक्याची चादर ओढून घेतली…
**
धुवाधार पाऊस
सारे चिडीचूप घरात…
एक पाखरु बागडतय साचलेल्या पाण्यात…
**
पावसाच्या प्रतिक्षेत
उभी पिके वाळून गेली…
तो थांबेल म्हणता म्हणता वाहून गेली..
**
तीन्हीसांजेस धुवाधार पाऊस
एक पाखरु वळचणीला…
केवढा आधार मनाला…
*
पावसाळी आभाळ
गच्च आलंय भरून…
मी ही पापण्या घेतल्या मिटून…
*
कुणीच नाही घरात
म्हणून आलो परसात…
तर फुलं.. पाखरं ही निमूट पानांत…
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
राजकुमार ह्यांच्या हायकू छान