श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 111 –हरवली पाखरं ☆
अशी हरवली पाखरं
मन हळवे अतं री।
किती समजावू रे मना
आभासाची गत न्यारी।
सदा प्रेमामृत मुखी
देई मायेने रे घास।
नको पिलांच्या रे माथी
तुझ्या आकांक्षाची आस ।
घाली मायेची पाखरं
जशी दुधात साखर।
घेण्या आकाशी भरारी
खोल घरट्याची द्वार द्वारं।
जगी अथांग झुंजण्या
देई कणखर आधार।
छाया तुझीच सानुली
कशी फिरेल माघार।
आचरणी सदा तुझ्या
संस्काराचे मिळे धडे।
मनामध्ये आभासी या
नको संशयाचे रडे।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈