महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 89
☆ प्रीत तुझी माझी.… ☆
(सहा-अक्षरी रचना…)
प्रीत तुझी माझी
सहज खुलावी
आपल्या प्रीतीला
दृष्ट न लागावी…
प्रीत तुझी माझी
बोलकी असावी
मनाची भावना
मनाने जानावी…
प्रीत तुझी माझी
बंध घट्ट व्हावे
गुज मनातले
तुजला कळावे…
प्रीत तुझी माझी
केवडा सुगंधी
निर्मळ सोज्वळ
शुद्ध ही उपाधी…
प्रीत तुझी माझी
मोगरा फुलला
ये मिठीत सखे
संध्या समयाला…
प्रीत तुझी माझी
राज हे मनीचे
मागणे मागतो
दान दे प्रेमाचे…
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈