सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ भोळा भक्ती भाव… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

जीव माझा वेडावला

दर्शनासी आतुरला

कुठे शोधू विठुराया

ओढ लागली मनाला ll१ll

*

पहाटेच्या आरतीत

फुललेल्या रे फुलात

बाळ लीला बघण्यात

शेतातल्या रे पिकात ll २ll

*

प्रपंचाचा हा डोलारा

सांभाळता सांभाळता

कष्ट सारे निवळती

तुझ्या नामात रमता ll ३ll

*

ओढ तुला भेटण्याची

डोळे भरू पाहण्याची

चालू लागती पाऊले

वाट मग पंढरीची  ll ४ll

*

ऐका आता पांडुरंगा

हाक माझ्या अंतरीची

तुज वीण व्यर्थ जन्म

फक्त आस रे भेटीची ll ५ll

*

ध्यास लागतो तुझाच

नको खेळू लपंडाव

कुठे शोधू विठुराया

भोळा माझा भक्तिभाव ll ६ll

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments