सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ आला दिनकर नभी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
आला नभी दिनकर
पूर्व दिशा उजळली
तिमिरातून सृष्टीला
हलकेच जाग आली
कोवळी किरणे उतरली
कळ्या फुले उमलली
दवबिंदूंची शोभा बघा
पानो पानी बहरली
पक्षांचे किलबिल कूजन
फांदी फांदी वर नर्तन
फुलपाखरांचे भिरभिरणे
कोकिळेचे मधुर गायन
सुखद गारवा प्रभाती
मंदिरी स्वर आरती
गाई गोठ्यात हंबरती
वासरे प्रेमे बिलगती
सांगे उठ मानवाला
दिनकर रोज सकाळी
घे उंच उंच भरारी
तळप मजसम त्रिकाळी
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈