सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ प्रार्थना धरणी आईची… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
ऋणी ..धरणी आईचा
काळया सुंदर मातीचा
तूच ……जगत जननी
मुखी घास भाकरीचा. १.
तुझ्या कुशीत जन्मलो
ताठ जगलो ..वाढलो
तूच ..श्वास जीवनाचा
तुझ्या ..वरती पोसलो. २.
घाव …निमूट सोसते
भले बुरे ते ….झेलते
माया ...तरीही करते
सर्वांसाठी ….बहरते. ३.
देते भरभरु ….सारे
ठायी नसे भेदभाव
किती गुण तुझे गावे
उपकारा नसे ..ठाव. ४.
टिळा लावतो मस्तकी
नित …चरण स्पर्शितो
अशी फुलावी फळावी
हीच ..प्रार्थना अर्पितो. ५.
नाते हे …..युगायुगांचे
तुझ्या कुशीत विश्रांती
तुझ्या सोबत …अखेर
आयुष्याची चीर शांती. ६.
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈