श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास “मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।)
इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”
☆ मित…… (भाग 2)☆
(मन प्रीतीने भरते आणि प्रेमाचा खेळ सुरू होतो. मग कधीकाळी उजाड वाटणारं रानही मग हिरवे गार मनमोहक वाटायला लागते. एक फोटो पाहून त्यावर भाळलेला मितवर त्याचा काय बदल होतोय……..)
फोटो पाहता त्याला कधी झोप लागली ते त्याला कळलेच नाही. रात्री उशीरापर्यंत तो जागा होता. आणि थंडीचे दिवस होते. म्हणून मित सकाळी उशीरापर्यंत झोपून राहीला. पहाटेची गुलाबी थंडीत त्याला झोपणयाचा अधिक मोह चढत होता. सकाळी फोन वाजला तेव्हा त्याला जाग आली. त्याने उशाखालून मोबाईल घातला आणि न पाहताच फोन उचलला आणि तसाच अर्ध झोपेत बोलायला लागला. समोरचा कणखर आवाज ऐकून त्याची झोपच उडाली. मित ” हो पप्पा मी बसतो गाडीत. सायंकाळपर्यंत पोहोचेन घरी ” आणि फोन ठेवला.
बाबांनी बोलावून घेतलं म्हणून मित घरी आला. सहा सात महिन्यानंतर तो घरी परतला होता. बाबांनी त्याला दहा -पंधरा दिवसांसाठी बोलावले होते. तसा मनमिळाऊ स्वभाव तर त्याचा होताच. पण मोठ्या शहरात शिकतो आणि उत्तम लिखाण करून ब-याच ठीकाणी त्याने बक्षिसे मिळविल्या कारणाने गावातली लोक त्याला विषेश आदराने बघायचे. त्याचं बोलणं एखाद्याला मोटिवेट करण्यासारखं असायचं. म्हणून कधी फोनवर तर कधी प्रत्यक्ष भेटून त्याची मित्रमंडळी त्यांच्याकडून कधी सल्ला तर कधी मार्गदर्शन घ्यायचे. गावात आल्यापासून त्याच्या भोवती मित्रमंडळ असायचे. त्याला तशी क्रिकेटची ही भारी आवड होती. मित आला म्हणून सुमितने त्याला क्रिकेट खेळायला शाळेच्या मैदानावर बोलावले. खेळून झाल्यावर सर्व आपापल्या घरी परतले पण मित मात्र अजूनही तेथेच होता. शाळेच्या आवारात लावलेल्या झाडांजवळ जाऊन तो बालपणातल्या शाळेतल्या आठवणी जागा करू लागला. आणि एकटाच स्वतःशी हसत तर कधी गंभीर मुद्रेत तया झाडाचं आणि शाळेचं निरीक्षण करू लागला. शेवटी तो एका निलगीरीच्या झाडाजवळ येऊन त्या झाडाला टेकून उभा राहिला. आणि गाणे गायला सुरवात केली. ” ऐ दिल तेरी मर्जी है क्या बता भी दे, खो ना जाऊ जूल्फो मे कही, बचा भी ले ” सुरेल अशा आवाजात तो हे गाणे गात होता. त्याचं आवडतं गाणं होतं म्हणून त्याने ते त्याच्या आवाजात रेकॉर्डही केलं होतं. बाजूलाच रस्त्यावरून जात असलेले रामदास अहिरेंनी ते सुर एकले. आणि त्यांच्याही नकळत त्यांचे पाय मित कडे वळले.
गाणं संपल्यावर त्याने डोळे उघडले. समोरचा अंधूक नजारा आणि डोळयात झालेला गारवा अनूभवून मित प्रसन्न झाला. त्याच्या चेह-यावर हलके स्मित आपसूकच पसरले. त्याचे गाणे एकून जणू वातावरणच रोमँटीक झाले होते. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. तेव्हा समोर रामदासभाऊ दिसले. त्याने स्मित हसून त्यांना नमस्कार वजा मान हलवली. “सुरेल गातोस तू. मन अगदी प्रफुल्लित करतोस बघ” असं म्हणून रामदास भाऊंनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. “धन्यवाद. पण तुमच्या एवढे नाही” रामदासभाऊ गावातले गीत गायन पार्टीचे संस्थापक होते. कोणाचाही घरी काही खास कार्यक्रम असला की रामदासभाऊ आणि पार्टीला हमखास बोलावणे असायचं. आणि रामभाऊही कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे सहभागी होत. ” तुझ्या बाबांनी एकदा म्हटलं होतं. पण अपेक्षेपेक्षा अधिक गोड आवाज आहे तुझा आज रात्री छगन आबांच्या घरी गीत गायनाचा कार्यक्रम आहे. ये सहभागी व्हायला ” रामभाऊंनी जास्त न घुमवत सरळ विचारले. त्यानेही स्मित हास्य करत होकारार्थी मान हलवली. ” ये मग रात्री साडेनऊला ” आणि ते तिथून निघून गेले.
( क्रमशः )
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो 9168471113