मराठी साहित्य – कादंबरी ☆ साप्ताहिक स्तम्भ #5 ☆ मित….. (भाग-5) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे
श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास “मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।)
इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”
☆ साप्ताहिक स्तम्भ #5 ☆ मित….. (भाग-5) ☆
अनोळखी असला तरी त्याच्या बद्दल खुप आपलेपणा वाटू लागला होता. आकर्षणाला ती सहसा भुलली नसती. तीने खुप विचार करून त्याच्यासोबत मैत्री केली होती. तिचा पर्सनल नंबरही दिला होता. त्यांनी फोनवर बोलण्यासाठी दिवसातली एक विशिष्ट वेळ ठरवून घेतली होती. रोज सायंकाळी गावच्या बाहेर असलेल्या एकांत जागेत जाऊन मित तिच्याशी बोलत असे. येण्या- जाण्याचा रस्ता मुस्कानच्या घरावरून होता. म्हणून त्या वेळी ती त्याची वाट बघत असायची. रोहित सोबत असतांना केलेल्या स्मित हास्याने ती गोंधळली होती. आणि आता त्याचं रोजचंच दिसणं तीला त्याच्याकडे ओढत होतं. नाजूक फुलांवर बसण्यास फुलपाखरू उतावीळ असतं. पण इथे फूलच त्या फुलपाखराला आपल्या पाकळ्यामध्ये सामावून घ्यायला उत्सुक होतं.
मितला तिच्या मनात जे काही चाललं होतं त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. पण तिचं असं त्याच्या येण्याने फुलून जाणं, डोळ्यातले भाव त्याला नुसतं पाहिल्याने बदलणं त्याच्या बद्दल तिच्या मनात गुंफत चाललेलं जाळं तिचे अब्बा आसिफ चाचा यांच्या नजरेतून मात्र सुटलं नाही. ग्रामपंचायत सदस्य असलेले आसिफ चाचा गावातले प्रतिष्ठित गृहस्थ होते. मितचे बाबा आणि त्यांच्यातली मैत्री सगळं गाव जाणून होते.
एके दिवशी रिमझिम त्याला म्हटली
रिमझिम- मनमीत पहचानिए हम कहाँ है
ती त्याला प्रेमाने मनमीत म्हणत असे.
मित- कहाँ?
रिमझिम- मै नही बताऊंगी. ये आपको पहचानना होगा.
तीने कोडं पाडत म्हटले.
मित – बताओं न प्लीज
रिमझिम- नही
आणि हसली
मित – कहाँ … कहाँ …. । अच्छा चलो कोई हिंट तो……
त्याचं वाक्य अपूर्ण राहीलं तेव्हा त्याला रेल्वेचा हॉर्न ऐकू आला. त्याने तिला विचारलं
मित- तुम ट्रेन मे हो?
रिमझिम- जी हाँ. मगर आपने कैसे पहचाना.
मित – ट्रेन का हॉर्न सुना. कहाँ जा रही हो
रिमझिम- हम हमारी फॅमिली के साथ महाराष्ट्र जा रहे है . टूर पर.
हे एकून मितला आभाळ ठेंगणी वाटू लागले. जणू ढगांना गार हवा मिळाल्याने जसे ते आकाशात उंच जातात. तसंच त्याला वाटत होते. हर्षाने अगदी उड्या मारू लागला तो.
रिमझिम- आप दिखाएँगे हमे आपका महाराष्ट्र. हम आपके लिए एक सरप्राईझ भी ले कर आ रहे है .
मित – क्या सरप्राईझ.
त्याला धीर निघत नव्हता.
रिमझिम- सरप्राईझ सरप्राईझ होता है बुद्धू . बताया थोड़े ही जाता है.
मित- अच्छा जी. कब तक पहुँचोगी
रिमझिम- अभी तो गुवाहाटी मे है . तीन दिन तो लग ही जाएँगे .
मित ( स्वतःशीच)- केव्हा जातील हे तीन दिवस
रिमझिम- क्या?
मित- कूछ नही. आपके स्वागत के लिए बेताब हूँ मै.
त्या दिवशी मित खुप खुश होता.
” क्या होगा तुमसे सामना होगा
दिल रहेगा मेरा या तुम्हारा होगा
थोड़ी-सी शरारत भी नही कर
पायेगा ये नादान
कुछ इस कदर तुझमे डूबा होगा
आपोआपच त्याला ह्या ओळी सुचल्या. अगदी स्वरबद्ध गाऊन त्याने त्याची मनाची स्थिती स्वतःसमोर व्यक्त केली. आणि घरी यायला निघाला. येतांना त्याला मुस्कान दिसली. त्याने स्मित केले. पण तो त्याच्या धुंदीत होता. तिला वाटले आपल्याला बघुन केले असावे म्हणून तिने स्वतः च लाजून खाली मान घातली. जे आसिफ चाचानी हेरले.
(क्रमशः)
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो 9168471113