श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास “मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।)
इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”
☆ साप्ताहिक स्तम्भ #7 ☆ मित….. (भाग-8) ☆
पुढचे दोन दिवस मुंबई सह महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळी फिरतांना त्यांचा हक्काचा मार्गदर्शक मीत होता. त्याचं सोबत असणं तिला आतल्या आत सुखावत होतं. त्याचं हसणं, बोलणं, वागणं, प्रत्येक गोष्ट संयमाने व विचारपूर्वक हाताळणं तिला त्याच्याकडे अधिकच आकर्षित करत होतं. सोबत घालवलेला प्रत्येक क्षण ती त्याला पारखत होती. एक चांगला मित्रच नव्हे तर चांगला जीवनसाथी होण्यास पात्र आहे का ? हे पाहत होती. आणि तिने केलेले विश्लेषण बरोबर आहे का हे स्वतःला विचारत होती. शुद्ध सोने सिद्ध होण्यासाठी कराव्या लागणा-या चारही परिक्षेतून ती त्याला पारखून घेत होती. आजचं त्याचं असं पावलो पावली काळजी घेणं असंच आयुष्यभर राहीलं का याचा अंदाज ती घेत होती.
अशा एक ना अनेक प्रकारे तिने त्याची परिक्षा घ्यायला सुरुवात केली होती. आणि तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो अगदी चोख देत होता. त्याच्यासोबत मारलेल्या गप्पांमध्ये त्याने त्याच्या बद्दल ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या अगदी तंतोतंत ती अनुभवत होती. आणि प्रत्येक परिक्षेत पैकीच्या पैकी गुण देऊन पास करत होती. आता तिच्या परिक्षाही संपल्या होत्या. आणि तिच्या वडिलांच्या सुट्ट्याही. शिर्डीला बाई बाबांचे दर्शन घेऊन ते मुंबईला आले. हाॅटेलवर येऊन सामानाची आवरा आवर करू लागले.
रिमझिम जड अंतःकरणाने सारी कामे करत होती. कदाचित तिला परत जायचं नव्हतं. तिच्या बाबांनी तिला ‘काय झालं ‘ विचारले पण ‘ काही नाही’ म्हणून तीने त्यांना टाळलं. गॅलरीत वाळत ठेवलेला स्कार्प काढायला गेली. तिच्यावर चोरटी नजर ठेऊन असलेला मीत संधी पाहून तिच्या मागे गेला. आणि तिच्या अगदी मागे उभा राहिला. स्कार्प काढून ती जशी मागे फिरली तशी तीच्या अगदी जवळ मीत उभा होता. ती क्षणभर घाबरली. पण सावरलीही. आणि एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून बघत राहीले.
रिमझिम- क्यो देखते हो ऐसी नजरो से की इंसान खो-सा रह जाए
मीत- मै भी हैरान हूँ. की तुम्हे देखकर क्यो आँखो में ये नुर-सा क्यो जाग जाता है. लेकीन सुकून भी उतना ही मिलता है. और दिल मे बेचैनी भी
रिमझिम- कुछ तो नाम होगा इस बेचैनी का. अपनापन या फिर………
मीत- या फिर…..
तीने लाजून मान खाली घातली. त्याने हळूच तिची हनुवटी वर केली. आणि
मीत- प्यार……….
लांब श्वास घेऊन मीत शब्द न काढता फक्त तोंडातून निघणा-या हवेच्या साह्याने बोलला. पुन्हा ती लाजली आणि मान खाली घातली. तिला त्याच्या डोळ्यांत डोळे घालून बोलायचे होते. आणि ती ही किती प्रेम करते हे जाहीर करायचे होते. पण शरमेने खाली गेलेल्या पापण्या वरती होत नव्हत्या. तशीच ती त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन विसावली. गॅलरीतून आलेल्या हवेच्या झुळूकने दरवाजाला लावलेला पडदा हळूच त्याच्या भोवती गुंडाळला गेला.
मीत – रिमझिम, पता नही क्यो, पर मुझे लग रहा है की तुम हमेशा के लिए रूक जाओ. मेरे साथ
रिमझिम- क्या ये संभव है?
मीत- तुम चाहो तो……..
त्याने तीला मिठीतून सोडले. आणि आपल्या समोर उभे केले. आणि हळूच तिची हनुवटी पुन्हा वर केली.
मीत- इन खुबसूरत आँखो मे मै जिंदगी भर डुब कर रह जाना चाहता हूँ. इन ओठों की हंसी यु ही उम्रभर बरक़रार रखना चाहता हूँ. इस हसी चेहरे का नूर यूँ ही हमेशा के लिए बरक़रार रखना चाहता हूँ. और जिंदगी भर बस तुमसे ही प्यार करना चाहता हूँ. अगर तूम चाहो तो……
ती लाजली आणि तेथून निघुन गेली. तिच्या गालावर पसरलेली लाली त्याला ते सगळं काही सांगुन गेली होती.
मुंबई सेंट्रलला रेल्वे उभी होती. ‘बेटा, इस अनजान जगह पर आने के बाद मुझे अपने बच्चो की बहोत फ़िक्र हो रही थी. पर तुम्हारे साथ होने के बाद लगा ही नही की हम अनजान जगह पर है. जितने भी साथ रहे. आप मेरे परिवार का हिस्सा बनकर रहे. वैसे तो आप उम्र मे बहोत छोटे हो हमसे. फिर भी आप का बहोत बहोत शुक्रिया. हमेशा खुश रहो.
मीत- अंकल जी, जब आपने हमे अपने परिवार का हिस्सा कहा है. तो मै ये आपको बता दूँ की अपनों का शुक्रिया अदा कैसा ?तेव्हा तिचा लहान भाऊ गिरीश म्हटला
‘ हाँ, और कभी गुवाहाटी आओ तो हमे जरूर बताना. हम तुम्हे गुवाहाटी की सैर कराएगे ‘
त्याच्या या विनोदावर सर्वच हसले.
मीत- जरूर आएँगे और गुवाहाटी के साथ साथ पुरे आसाम की खुबसूरती तुम्हारी नजरों से ही देखेंगे
तेवढ्यात गाडीचा हाॅर्न वाजला. रिमझिम चे बाबा ‘ अच्छा बेटा हम करते है. अपना खयाल रखना’ आणि गाडीत बसायला लागले. खिडकीतून रिमझिमला त्याने एक नजर शेवटचे पाहिले. आणि हळूच ‘हॅप्पी जर्णी ‘ म्हटले. गाडी सुरू झाली. मीत मागे परतला.
बसमध्ये तिच्यासोबतच्या आठवणींमध्ये हरवला. कधी स्मित हास्य तर कधी काळजी असे प्रसंगानुरूप त्याच्या चेह-यारचे भाव बदलत होते. तसेच काहीसे रिमझिमचे पण होते. पण सर्वापासून तिने ते भाव अगदी शिताफीने लपवले होते.
मीत घरी पोहोचला. बॅगेतला सामान तो कपाटात ठेवत होता. तेव्हा त्याला बॅगेत एक पार्सल दिसले. ते त्याचे नव्हते. मग कोणी ठेवले हा प्रश्न त्याला पडला. आणि उत्सुकतेने त्याने ते पार्सल उघडले. आणि त्याला आश्चर्य झाले. आत तीच बुद्धमुर्ती ठेवलेली होती. जी अजिंठा लेण्या पहायला गेले असतांना त्याला पसंत पडली होती. ती रिमझिम ने त्याला माहीती न पडू देता त्याला भेट दिली होती. त्या मुर्तीच्या मागे तीने एक कागद चिकटवलेला होता. त्याने पाहीले. ज्यावर लिहीले होते, ‘ मनमीत जी, अपने कहा की आप मेरे चेहरे की हसी जिंदगी भर यूँ ही बरक़रार रखना चाहते हो. तो अपना बहोत खयाल रखीएगा. क्यो की अब मेरे चेहरे की मुस्कान आप हो……..
क्रमशः
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो 9168471113