सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– दगडावर बीज रूजविले – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
प्रचंड मोठ्या दगडाच्या
मुळे रोऊनी छातीवरती
ताठ मानेने न्याहाळतो
खाली पाणी निळाई वरती
☆
दगडावर बीज रूजविले
त्याच्यावर धरून सावली
बेचक्यात जपली तयाने
माझ्यापुरती मातीमाऊली
☆
जन्म कुणाचा कुठे असावा
नसतेच कधी कोणा हाती
पण जन्माचे सार्थक करणे
असते आपुली वापरून मती
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈