सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
☆ घाट कहाणी…
☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
मानव आणि निसर्ग यात
एकदा भांडण की जाहले
मान व पाठ एक करून
आव्हान हसत स्विकारले॥
☆
राईचा त्या पर्वत बनला
दोन गावात मज्जाव आला
राई पर्वतांची उभी राही
मानवाला निर्बंध पडला॥
☆
शिवा युक्ती मनी आठवली
शिव शंभूची प्रार्थना केली
शिवा म्हणूनी दोन गावांना
वाघ नखे हाती चढवली॥
☆
पोट पर्वताचे टरटरले
मनू हस्त ना थरथरले
पोटमाळे केले पर्वतांचे
मार्ग त्यातूनच निर्मियले॥
☆
घाट गाव जोड प्रकल्पाचा
निर्धाराने पहा पूर्ण केला
घाट झाली आता वहिवाट
आता मधे निर्बंध नुरला॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈