चित्रकाव्य
– मोगरा… कवयित्री : सुश्री ज्योती कुलकर्णी – ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
☆
निळ्या आकाशात चांदण्यांची आभा
अलगद झेलून अंगणात मोगरा उभा
☆
लावियला दारी मोगर्याचा वेल
म्हटले त्याला पुरे अवकाश झेल
उन्हाची लखलख झाली भारी
मोगरा दरवळला रंगत न्यारी
☆
चांदण्यांचे मोती उधळले आकाशाने
अलगद झेलले ओंजळीत धरतीने
सौंदर्य त्यांचे झाले सुगंधाविना उणे
मोगर्यात फुलवले धरतीने चांदणे
☆
चांदणे पिऊन मोगरा खूप फुलला
पानोपानी कसा बहरून आला
बहर कानात काही सांगून गेला
तुझ्या घरी आलो मी फुलायला
☆
निळ्या आकाशात चांदण्यांची आभा
अलगद झेलून अंगणात मोगरा उभा ……
☆
कवयित्री : सुश्री ज्योती कुलकर्णी
अकोला
संग्रहिका : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈