श्री सुहास रघुनाथ पंडित
चित्रकाव्य
मुरली-धर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
अप्रतिम कल्पना आहे बासरीच्या जन्माची. चित्रही तितकेच सुरेख.निवडलेले रंगही अचूक आणि प्रभावी. बासरीच्या जन्माची कल्पना वाचून सुचलेले काव्य :
☆
लहरत लहरत येता अलगद
झुळुक शिरतसे ‘बासां’मधूनी
अधरावरती ना धरताही
सूर उमटती वेणू वनातूनी
☆
त्याच सूरांना धारण करता
श्रीकृष्णाने अपुल्या अधरी
सूर उमटले ‘बासां’मधूनी
आणि जन्मली अशी बासरी.
☆
बांस,वेणू =बांबू
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈