श्री आशिष  बिवलकर

(श्री आशिष  बिवलकरआपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत) 

अल्प परिचय 

नाव  : अशिष  भानुदास बिवलकर शिक्षण : B. कॉम। जन्म : ०४ ऑक्टोबर १९७९ आवड : समाज सेवा, मंदिर  व्यवस्थापन। कविता लेखन (वर्ष  २०१९ पासून )

व्यवसाय : नोकरी (खासगी)

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गजरेवाला…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

गजरा मोगऱ्याचा विकता विकता,

बालपण मात्र कोमजले !

सुगंध मोगऱ्याचा दरवळता दरवळता,

गंधहीन बालपण झाले !

गुंफून मोगऱ्याच्या फुलांची लडी,

हातात घेऊन उभा तो राही !

घासाघीस किंमतीची त्याच्याशी चाले,

बालकष्ट कोणीच पहात नाही !

शुभ्र  मोगऱ्याच्या फुलांनी,

कुणाचा तरी रंगमहाल सजला !

थकला कोवळा जीव,

क्षणभर कोपऱ्यात बसून निजला !

पुस्तकाची पाने राहती ती दूर,

मीठ भाकरीचे पान त्याला दिसे !

फाटक्या परिस्थितीने नाडलेल्याला ,

जगात वाली मात्र कोणीच नसे !

मिळतील दोन पैसे कष्टाचे,

तेव्हा घरातली चूल जळेल !

इवल्याश्या पोटाच्या खळगीत,

कसेबसे दोन घास पडेल !

मुले म्हणजे देवाघरची फुले,

बालपणाला निर्माल्याची कळा येई !

दगडातला देव शोधणाऱ्या माणसा,

देवाघराच्या फुलांची तुला नाही उतराई !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments