सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
☆ अंतर्बोल
☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
फांदीवरी येऊनी बैसली
यौवना ही अशी एकांती
चलबिचल चाले अंतरात
मनी विचार दाटूनी येती..
वाटे तिजसी कुणीच नसावे
आज माझ्या अवतीभवती
गहिरे अंतर्बोल ह्रदयातले
पुस्तकामधूनही डोकाविती..
धुंदमंद मोकळ्या हवेत
निसर्गाचिया सान्निध्यात
अस्फुटसे बोल अंतरीचे
गूज-गुपीत राखी मनांत..
बंधही होती तरलशिथिल
हरपले जगताचेही भान
स्मरविव्हळ त्या शब्दांनी
झूलती बोल गाती आत्मगान..!
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈