श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– ध्यास…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

पाईपमध्ये मांडला संसार,

त्यात वाढवतेय सावित्रीची लेक !

शिक्षणाचा ध्यास तिला,

लहान डोळ्यात स्वप्न पाहते अनेक !

ना स्वतः चे घर,

ना शिरावर छप्पर कुठले !

ना उजेडाला दिवा,

ना झोपायला खाटले !

परिस्थितीशी झगडा,

पण शिक्षणाची तळमळ !

सरस्वतीच्या मंदिरासाठी,

मायलेकींची चाले धावपळ !

नशिबाची घंटी जरी अबोल,

तरी शाळेच्या घंटेकडे लागे कान !

उशीर नाही ना होणार शाळेला,

याचे सदैव राही दोघींना भान !

सर्व शिक्षणाचा अधिकार,

प्रत्येक पाल्याचा जन्मजात हक्क !

तो गाजवण्यासाठीची जिद्द पाहून,

फाटकी परिस्थिती होई थक्क !

गुणवान मुलगी शिकेल सवरेल,

चांगल्या दिवसांची आईला हो आशा !

खडतर वर्तमानाच्या छातीवर पाय ठेवत,

उज्वल भविष्यासाठी ठरवलीय तिने दिशा !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments