श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
☆ वारी
☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
आषाढाच्या सरींनी
चिंब भिजे धरणी सारी,
टाळ मृदूंगाच्या नादात
चाले पंढरीची वारी !
शिरी कोणी घेई विठुराया
कोणी तुळशी वृंदावन,
गजर चाले सावळ्याचा
विसरून सारे देहभान !
दिसे डोळ्यापुढे पांडुरंग
लागला भेटीचा ध्यास,
वाटेतल्या काट्या कुट्यांचा
सांगा कसा होईल त्रास ?
होता दर्शन आषाढीला
पारणे डोळ्यांचे फिटेल,
विरह माय माऊलीचा
सारा चंद्रभागी बुडेल !
सारा चंद्रभागी बुडेल !
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
०९-०३-२०२३
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈