सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– दोन पेले… –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
सुगंधाने भरले असे दोन पेले
आकर्षक रंग तया लाभलेले
नासिके समीप प्याल्यास नेता
दरवळात गात्र प्रफुल्लित झाले ……
मोहकवर्णासवे दो चषकांना
ओठाशी घ्याया मन राहवेना
तबक पाचुचे सौंदर्यात वाढ
निसर्गापुढे झुकतात माना ……
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈