चित्रकाव्य
मित्रत्वाचा सल्ला… (चित्र एकच… काव्ये तीन) ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री निलांबरी शिर्के ☆
श्री आशिष बिवलकर
[1] मित्रत्वाचा सल्ला…
☆
एकमेकांशी स्पर्धा करणारेही
एकमेकांच्या सोबतच जगतात !
माणूस असो वा प्राणी
आपल्या सोईप्रमाणेच वागतात !
☆
कवी : आशिष बिवलकर. बदलापूर.
९५१८९४२१०५
श्री प्रमोद वामन वर्तक
[2] – मित्रत्वाचा सल्ला…
☆
पाऊस धो धो पडतोय
गाठ पडली बिळात,
विसरला नाहीस ना रे
हरवले तुला खेळात ?
☆
शर्यतीत गाजर खाऊन
झोपलास झाडाखाली,
असं कसं विसरलास
शर्यत लागल्ये आपली ?
☆
सल्ला देतो तुला मित्रा
गर्वाच घर खाली असतं,
हवा डोक्यात गेली की
बक्षीस हमखास हुकतं !
☆
इसापनीतीत प्रसिद्ध
ससूल्या आपली जोडी,
हट्ट करून शर्यतीसाठी
काढू नको परत खोडी !
काढू नको परत खोडी !
☆
© प्रमोद वामन वर्तक
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
☆☆☆☆☆☆
सुश्री नीलांबरी शिर्के
[3] मित्रत्वाचा सल्ला…
☆
पावसाने धुमाकुळ घातला
शर्यत नकोच भाऊ
कासवदादा चल आपण दोधे
एकमेकां सोबत देऊ –
☆
शर्यत आपली विसर आज
सुरक्षित आधी होऊ
संकट आले जरी काही तर
आधार एकमेक होऊ –
☆
पाणी जादा इथवर तर
पाठीवरती घेशिल ना !
हळूहळू चालत चालत
सुरक्षित जागी नेशील ना ! –
☆
खेळता प्रतिस्पर्धी आपण
संकटी आधार होऊ
यापुढे जगूया असे की
मित्र नव्हे, खरे भाऊ —
☆☆☆☆☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈[3]