?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  पाऊलखुणा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सुश्री निलांबरी शिर्के ☆

श्री आशिष बिवलकर   

?– पाऊलखुणा… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

हातात हात तुझा,

करू सोबत जीवनाचा प्रवास !

हृदयावर कोरले नाव तुझे,

रम्य वाटतो तुझा सहवास !

श्वासात माझ्या,

दरवळे तुझाच गंध !

स्वर्गीय सुखासारखे,

तुझ्या प्रीतीचे मर्मबंध !

फेसळणारा विशाल सागर,

तुझ्या माझ्या प्रीतीची देतोय साक्ष !

अथांगता त्याची हृदयात,

तुझ्या प्रीतीतच दिसतो मज मोक्ष !

तुझ्या माझ्या पाऊलखुणा,

या लाटा  सहजच  पुसतील !

मनातल्या गाभाऱ्यात सदैव,

आपल्या प्रेमाचे ठसे दिसतील !

चिरंजीवी असू दे,

आपल्या प्रेमाची कहाणी !

माझ्या हृदयाचा तू राजा,

तुझ्या ह्रदयाची मी राणी !।

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

सुश्री नीलांबरी शिर्के

?– पाऊलखुणा… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

( २ ) 

हातात  हात आश्वासक  साथ

न बोलता कळते काय मनात

जोडीने पावलाचे ठसे उठती

ओलसर वाळूत सागर काठात — 

 लाटा गाजेच गीत गात येतील 

 पाऊल खुणांना सवे नेतील

 रोज समूद्राच्या गाजेमधून 

 आपल्या प्रेमाचे गीत गातील —

 अथांग  सागर असंख्य  लाटा

 त्यात आपला तरलसा वाटा

लाटा ,सागर ,रेती ,किनारा

आपल्या आनंदाच्या पेठा —

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments