सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
तरंग
☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☆
टाकताच खडा पाण्यात
जलाशयात तरंग उमटती
सागरातील उत्तुंग लहरी
किनार्यावरी येऊनी शमती..
☆
सूर्यकिरण पडताच
चमचमती जलतरंग
अंतरडोहातूनी डोकाविती
अंतरंगातील आत्मरंग..
☆
निसर्गात चौफेर दिसती
विविध छटांचे मोहीत रंग
सुखद कधी व्यथित करती
विचारांचे असीम भावतरंग..
☆
तरंग असले हे मनातले
कुणास नाही दिसले
किनारी उभी राहता
मम मनाशीच जाणवले..!
☆
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈